कल्याणमध्ये काँग्रेसला मोठे बळ, भाजपच्या माजी नेत्यासह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कल्याण: आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस (secretary services) राजाभाऊ पातकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.

राजाभाऊ पातकर, (secretary services) जे पूर्वी काँग्रेस पक्षात होते, त्यांनी 2014 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी जिल्हा सरचिटणीस आणि संपर्क प्रमुख या पदांवर यशस्वी कामगिरी केली. मात्र, भाजपच्या सध्याच्या धोरणांशी असहमती दाखवत पातकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश उद्या मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ही माहिती दिली आहे.

राजाभाऊ पातकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशासह आणखी काही भाजप पदाधिकारी काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोटे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

विकासापासून खूप खूप दूर राजर्षी शाहूंचं कोल्हापूर…!


ऑफिसचं काम घरी आणायचंच नाही, बॉसचा फोन आला तर… घाबरू नका, आता कायदाच आलाय..


इचलकरंजी युवतीच्या विनयभंगप्रकरणी महिलांचा संताप!