काँग्रेसकडे 13 नव्हे 14 खासदार, पटोलेंना सांगलीचा ‘विशाल’ हात

ठाकरे काय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खुद्द नानाभाऊंनी बजावूनही सांगलीतून(political action committees) खासदार होण्याच्या ईर्ष्येने विशाल पाटलांनी अर्ज भरला. ‘आपण निवडून येणार आणि दिल्लीत दिमाखात जाणार’ छातीठोकपणे सांगून पाटलांनी सांगलीत ‘विशाल’ विजय खेचून आणला.

भाजपच्या नेटवर्कमुळे खासदार संजयकाका पाटील हमखास(political action committees) निवडून येतील, असं सांगितलं जात होते. पण, निवडणूक लढणार आणि जिंकणार, असं म्हणत इरेला पेटलेल्या विशाल पाटलांनी संजयकाका पाटलांचा पराभव केला.

निवडणूक निकालानंतर विशाल पाटील काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असतानाच, विश्वजीत कदमांच्या पुढाकाराने ते मुंबईत नानाभाऊंची भेट घेणार आहेत. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेसचे ‘हात’ बळकट करणार असल्याने या पक्षाच्या 13 खासदारांची संख्या 14 होईल.

राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या संजयकाका पाटलांचा एक लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला. त्यामुळे हॅटट्रीक नोंदवण्याचं संजयकाका पाटलांचं स्वप्न भंगलं. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली.

सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावरून ‘इंडिया’ आघाडीत बराच काळ राष्ट्रीय पातळीवर खल सुरू होता. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा ठरला. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष ही निवडणूक लढली होती. महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. सुरूवातीला तिरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी झाली. विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात सामना झाला. त्यात विशाल पाटील यांनी बाजी मारली.

हेही वाचा :

प्रजेचं राजाशी असलेलं नातं निवडणुकीतून झालं व्यक्त

लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार

वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?