काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव; ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप 

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या(politics) निवडणुकांची रणधुमाळी संपली. महायुतीला अभुतपूर्व यशही मिळाले,पण निवडणुकीच्या निकालावर मात्र राज्यभरातून संशय निर्माण होऊ लागला आहे. पण त्यानंतरही राज्यातील नवे सरकार संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

निवडणुकीत(politics) विजयी झालेल्या महायुती अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी खलबतं सुरू आहेत.तर महाविकास आघाडी अद्यापही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडीच्या पराभवाला काँग्रेसचा अति आत्मविश्वास कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी निकालानंतर 5 दिवसांनी काँग्रेसवर उघड आरोप केला आहे. सगळे सुट घालून तयार होते. पण काँग्रेसच्या अतिआत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. पण आता भविष्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व 288 मतदारसंघांवर ताकद लावणार असल्याचा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते असून ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी पहिल्यांदाच आघाडीतील एका मोठ्या नेत्याने उघडपणे बोलून या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा टोला लगावला. काँग्रेसचे प्रत्येक नेते सूट घालून तयार होते. ते अतिआत्मविश्वासात होते आणि या अतिआत्मविश्वासामुळेच पराभव झाला. शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटप सुरूच राहिले आणि सर्वेक्षणाच्या नावाखाली लोकसभा निवडणुकीचे निकाल दाखवून जागा घेतल्या आणि पराभूत झाले.

निवडणुकीतील पराभवानंतर मातोश्रीवर बोलावलेल्या सभेत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीनंतर पक्ष संघटना वाढवण्याबाबत बोलताना दानवे म्हणाले, या निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी भविष्यात 288 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत कऱण्यासाठी आम्ही पावले टाकणार आहोत. आम्ही सर्व जागांवर लढूच असं नाही, पण महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करणे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदापासून दूर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे सांगितले होते. दानवे म्हणाले की, भाजपच बहुमतात आहे. अशा स्थितीत असे प्रकार अपेक्षित नसावेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असते तर तेही चुकीचे ठरले असते. पण शिंदे हा चेहरा असेल तर भाजपमध्ये चेहरे नाहीत का? “ही सीट चेहऱ्याशिवाय आली आहे का?” ते म्हणाले की, शिंदे यांच्या घोषणेनंतरही त्यांचे खासदार अमित शहांना भेटतात, ते शिंदे यांचे ऐकत नाहीत का?

हेही वाचा :

हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?

‘लाडक्या बहिणीं’ना प्रतिक्षा सहाव्या हफ्त्याची; 1500 की 2100 संभ्रम कायम…

लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले…