नाशिक : इगतपुरीचे काँग्रेस आमदार(latest political news)हिरामण खोसकर यांनी माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतली. पाच वर्षांपूर्वी शरद पवार यांनीच खोसकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात जाण्यास भाग पाडून इगतपुरीतून त्यांची उमेदवारी निश्चित केली होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक राजकीय घटना घडल्यानंतर खोसकरांना पुन्हा एकदा पवारांचे दरवाजे ठोठवावे लागले आहेत.
काँग्रेस पक्ष(latest political news) कार्यालयात निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन आमदार हिरामण खोसकर यांनी आपली मुलाखत दिली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर यांच्यावर पक्षाचाच आक्षेप असून तेव्हापासून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत डळमळीत अवस्था असल्याचे पक्षातून बोलले जात होते. मात्र, खोसकर यांनी या सर्व गोष्टींचा इन्कार केला असून, आपण शिवसेना उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मतदान केल्याची म्हटले आहे.
दरम्यान, तरी देखील खोसकर यांच्या भोवतीचा संशय पिच्छा सोडायला तयार नसून शनिवारी झालेल्या मुलाखतीत इगतपुरीतून जवळपास अर्धा डझन इच्छुकांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याने खोसकर यांचे आसन डळमळीत झाले आहे. खोसकर तातडीने पुणे येथे शरद पवार यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांनी पवार यांची भेट घेतली.
शिवाय निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना पक्ष उमेदवारीबाबत ठोस असा शब्द देत नसल्याने प्रचार करण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले. पवार व खोसकर यांच्यामध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी पवार यांनी खोसकर यांचे म्हणणे ऐकून घेत यासंदर्भात काँग्रेस पक्षाशी बोलणार असल्याचे सांगितले.
आमदार हिरामण खोसकर हे निवडून आल्यापासूनच वादात सापडले असून, पाच वर्षांपूर्वी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर खोसकर यांना भाजपकडून 40 कोटींचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, खोसकर त्याला भुलले नाहीत. त्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या घडामोडीत देखील खोसकर यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही.
हेही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा?
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये
पुन्हा वंदे भारत ट्रेनवर हल्ला! अनेक डब्यांचं नुकसान, खिडकीच्या फोडल्या काचा