महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

देश व राज्यात पेपर फुटीचे वाढते प्रमाण, नोकर भरतीला ब्रेक, शेतमालाला भाव(grand) न मिळणे, खते व बियाण्यांचा काळाबाजार, शेतकऱ्यांची कर्जासाठी होणारी अडवणूक आदी मुद्दे घेऊन जिल्हा कॉग्रेस पक्षाने शुक्रवारी दुपारी महायुती सरकारवर चिखलफेक केली. कॉग्रेस भवनाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकारचे फलक बनवून त्यावर चिखल फेकण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हाध्यक्षप्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात(grand) आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी जि. प सदस्य प्रभाखर सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहमद, हरीश गणवाणी, शहराध्यक्ष श्याम तायडे, डॉ ए.जी भंगाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ ,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,

आत्माराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, धनंजय चौधरी, आशुतोष पवार, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष, दिनेश पाटील, सुभाष जाधव, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, एस. टी.पाटील, सचिन सोमवंशी, भडगांव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, बोडवड दिलीप पाटील, पिंटू पाटील, चोपडा अध्यक्ष नंदकिशोर संगोरे, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी,

धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही. डी. पाटील, शहराध्यक्ष अनंत परीहार, रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, अमळनेरचे गोकुळ बोरसे, वाशिम काझी, देवीदास ठाकरे, मीरा सोनवणे, युवराज खडके, दीपक सोनवणे,जलील पटेल, डॉ.एैश्वरी राठोड, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा

तुच घे बाबा! ऋषभ पंत कॅच घेत असताना कर्णधार रोहितने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन

सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार… जागीच मृत्यू