काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही; मिलिंद देवरा यांचं टीकास्त्र

काँग्रेस काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज(self respect) आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत. काँग्रेसने दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला. दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई(self respect) मतदारसंघासाठी इच्छुक होत्या. मात्र ही जाागा ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना देण्यात आली. त्यावरून मिलिंद देवरा यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं आहे.

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही. महाविकास आघाडीतील पक्ष खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आलेत. काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, अशी टिका मिलिंद देवरा यांनी केली आहे.

शुक्रवारी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत देवरा त्यांनी लिहिलं की, “दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे.”

वर्षा गायकवाड यांना तिकीट का मिळालं नाही याचंही कारण मिलिंद देवरा यांनी आपल्या पोस्टमधून सांगितलं आहे. “माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळवले की, वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्दैवी आहे.”, असा दावा करत या मानसिकतेचा मिलिंद देवरांनी निषेध व्यक्त केलाय.

हेही वाचा :

काँग्रेसचा शेवटचा प्रयत्नही असफल; ‘उत्तर मुंबई’च्या बदल्यात ‘सांगली’चा प्रस्तावही ठाकरेंनी फेटाळला

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील : संजय राऊतांचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील डझनभर नेते आमच्या पक्षात येणार; जयंत पाटलांचा दावा