“सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या यांचा धक्कादायक निर्णय, राजकीय वातावरणात खळबळ”

सांगली : सांगलीच्या बंडखोर काँग्रेस(Congress) नेत्या जयश्री मदन पाटील या 2 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती मात्र दोन डिसेंबर रोजी जयश्री मदन पाटील यांनी फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ इतकेच वक्तव्य करत पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(Congress) जाणार असल्या बाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच जयश्री पाटील या दोन डिसेंबर स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंती दिवशी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे जयश्री मदन पाटील या आज मोठा निर्णय जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती.

मात्र स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या वेळी जयश्री पाटील यांनी कोणताही निर्णय न घेता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली. जयश्री मदन पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र कार्यकर्ते निराश झाले पण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयश्री पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

त्यामुळे जयश्री मदन पाटील या कोणत्या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. त्यांची योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती? असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

जयश्री पाटील या स्वर्गीय नेते आणि माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.

परंतु आता सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी जयश्री पाटील यांना ‘क्लीन चिट’ असल्याचे समजले जाते.जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने जिल्हा सहकारी बँक, सांगली महापालिकेत, त्याचबरोबर बाजार समितीत राष्ट्रवादीचे ‘वजन’ वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

अफवा पसरवाल तर याद राखा! आयोगाने डोळे वटारले!

‘शिवशाही’ची चाकं थांबण्याच्या मार्गावर?; एसटीच्या भाडेवाढीसह अनेक निर्णय प्रस्तावित

मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली

मराठमोळा क्रिकेट IPL 2025 मध्ये करणार शाहरुख खानच्या KKR चं नेतृत्व?