लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मंगळवारी काँग्रेसला(total battle)मोठा धक्का बसला आहे. आधीच एका काँग्रेस उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातीलच काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री रामनिवास रावत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव(total battle) यांच्या उपस्थितीत रावत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. रावत यांनी विजयपूर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढवली होती.
राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले रावत हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. ते प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. पक्षश्रेष्ठींकडून होत असलेले दुर्लक्ष आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी विचार न झाल्याने ते मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रावत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. मागील महिनाभरापासूनच ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. पण लोकसभेचे तिकीट मिळण्याच्या आशेवर ते काँग्रेसमध्ये होते. काही दिवसांपुर्वी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांत दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मुरैना-श्योपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते रावत यांनीही पक्षाची साथ सोडली आहे.
हेही वाचा :
कोल्हापूरात आचारसंहिता पथकाला चकवा देत जावळ, बारसं, वाढदिवसानिमित्त तांबड्या-पांढऱ्यावर ताव
सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर
हातकणंगले मतदारसंघांत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!