सांगलीतील राजकीय रणांगण उफाळले: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-ठाकरे गट संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

लोकसभेनंतर विधानसभेलाही सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापणार (assembly)असल्याचे दिसत आहे. सांगलीमध्ये लोकसभेला काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे गटामध्ये उमेदवारीवरुन सामना झाल्याचे पाहायला मिळाले होते. ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष मैदानात उतरत खासदारकी मिळवली. लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी युती नकोच, अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात विधानसभा निवडणुकांचे(assembly) वारे वाहू लागले असतानाच सांगली जिल्ह्यामधील राजकारण तापले आहे. सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटलांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूती यांनी केली आहे.

तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार विशाल पाटलांनी दिलेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत आघाडी नको,अशी मागणी देखील संजय विभूते यांनी केली आहे. संजय विभूते यांच्या मागणीमुळे आगामी काळात काँग्रेस अन् ठाकरे गटामध्ये जोरदार वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान,खासदार विशाल पाटलांनी खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास देखील विशाल पाटलांची भूमिका आणून देणार असल्याचे संजय विभुतेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.

हेही वाचा :

शेतीच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून

फडणवीसांना चिमुकलीची राखी, हे प्रेम कोणालाही नको वाटणार नाही

पुण्यातील फिनिक्स मॉलला बॉम्बहल्ल्याची धमकी, सुरक्षा व्यवस्था कडक