लोकसभा निवडणूक 2024मध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून(Congress) रोजी होणार आहे. याच टप्प्यात पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीतही मतदान होणार आहे. मतदानाआधी या मतदारसंघात काँग्रेसही आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आपला सहकारी पक्ष समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत मंगळवार(28 मे) जनसभा करणार आहे.
याबाबत माहिती देताना, ‘वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस(Congress)उमेदवार अजय रॉय म्हणाले, उद्या राहुल गांधींची ऐतिहासिक परिवर्तन जनसभा होणार आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव सायंकाळी 4 वाजेपासून मोहनसराय जिथे मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला, तिथे महासभा करतील. मला वाटतं की संपूर्ण देश, प्रदेश आणि विशेषकरून वाराणसीत सातव्या टप्प्यात परिवर्तनाची लाट येथूनच निर्माण होईल.’
याआधी राहुल गांधी आणि अखिलेश यादव प्रयागराजमध्ये एका रॅलीला संबोधित एका सभेला संबोधित करण्यासाठी पोहचले होते. जिथे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला होता आणि बॅरिकेड्स तोडून मंचापर्यंत पोहचले होते. यामुळे पळापळही झाली होती.
यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना सभेला संबोधित न करताच तिथून निघावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर वाराणसीत दक्षता बाळगली जात आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी पावलं उचलली गेली.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त महासभा सायंकाळी 4 वाजता मोहन सरायमध्ये होतील. यास परिवर्तन रॅली नाव दिलं गेलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडी बनल्यानंतर उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना अनेक रॅलींमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सर्वात आधी ते आग्रा येथे एकत्र दिसले होते.
हेही वाचा :
कोल्हापुरात युवकास अटक, 5 लाख 30 हजार रुपयांच्या 11 दुचाकी जप्त
मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग
पुणे अपघाताने राजकीय वातावरण तापलं; मुश्रीफांची धंगेकरांना ‘वॉर्निंग’!