इचलकरंजी: इचलकरंजीतील काँग्रेस(Congress) पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता श्री राजू बाबुराव आवळे यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्र नगरीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. आज रविवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
श्री राजू आवळे हे इचलकरंजी काँग्रेसचे(Congress) एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांनी इचलकरंजी पालिकेच्या शिक्षण सभापतीपदी असताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांची स्वभावविशेषता म्हणजे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला समजावून सांगणे, ज्यामुळे ते सर्वांशी आपुलकीने वागत असत.
त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांचा समाजातही आदर होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच इचलकरंजी आणि परिसरातून राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने इचलकरंजी काँग्रेस पक्षाला आणि समाजाला मोठी हानी पोहोचली आहे.
हेही वाचा :
राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा
‘रुपानं देखणी, सुपारी चिकणी’; कोल्हापूरच्या वाघानं रशियन इरीनाला लावलं मराठीचं वेड
गटारीची पार्टी पडली महागात, कारसह पाच मित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, अन् मग…