काँग्रेसचे ‘एक नोट-एक व्होट’ ;

‘महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सर्वसामान्य (general)कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ‘एक नोट-एक व्होट’ देत नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हाती घ्यावी,’ असे आवाहन केले जातात.

पुणे : ‘महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ‘एक नोट-एक व्होट’ देत नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हाती घ्यावी,’(general) असे आवाहन केले जातात. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेळाव्यात ४२,७०० रुपये लोकवर्गणी जमा झाली.

धंगेकर यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात ॲड. चंदू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यांनी हे आवाहन केल्यानंतर प्रतिसाद मिळाला. या वेळी धंगेकर यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, लक्ष्मी दुधाणे यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत भाजपने संपूर्ण पुणे शहराची वाट लावली,’ असा आरोप धंगेकर यांनी केला. पुणेकरांना आता बदल हवा आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार म्हणून पुणेकर मला नक्कीच निवडून देतील, असा विश्‍वासही धंगेकर यांनी व्‍यक्‍त केला.

जगताप म्हणाले, ‘‘सामान्य जनतेसाठी धावून जाणारा माणूस म्हणून धंगेकर यांना पुणेकर नक्कीच भरभरून मतदान करतील.’’ या वेळी इतर वक्त्यांची भाषणे झाली. कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी प्रास्ताविक केले. यशराज पारखी यांनी आभार मानले.

हेही वाचा :

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

महाराष्ट्र हादरलं! 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा