बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय:अजित पवार

आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही, तर माझं काम सगळं सांगतं. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतला आताची निवडणूक(Election)माझ्य भवितव्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. ते बुधवारी लोणी भापकर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली.

काल पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यांनी कुणावर टीका केली नाही. मागच्यावेळी केली तर गडबड झाली. आता फक्त विकासावर बोलले. लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक(Election) आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आयला अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच काढला. मुलासारखाच आहे ना? मुलगी झाल्यावर साहेबांना नातू काढला, मी पण पुतण्या आहे ना?, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार बुधवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेदड या तीन गावांचा दौरा करत आहेत.

लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतला आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. काही प्रमुख नेते आहेत, त्यांच्यात माझे नाव आहे. नाव व्हायला वेळ लागतो. 2004 पासून मला थोडं सीनियर म्हणायला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालायला लागलो. शरद पवार साहेबांनी 30 वर्षे राज्यात काम केल्यानंतर ते दिल्लीत गेले, असे अजित पवार यांनी म्हटले.

आपल्या तालुक्यातील मुले काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाही. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नवीन चेहऱ्यांना मी पुढे आणेल.

तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितले. 89 ला साहेब म्हणत होते मी अजितला तिकीट देणार नाही. 91 ला मला तिकीट दिले. आता काही लोक काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली, अशा शब्दांत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना लक्ष्य केले.

मला इंग्लिश येऊ नाहीतर येऊ नये, परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडेसहा लाख कोटींचा बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला. मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा :

नववधुप्रमाणे सजवा तुळशी वृंदावन, साजश्रृंगारासाठी अशी करा तयारी

‘…तर बाय रोड जाऊन दाखव!’; उद्धव ठाकरेंनी कोकणात पाऊल ठेवण्याआधीच नारायण राणेंचा इशारा

‘त्या’ फाईलचं नेमकं प्रकरण काय? …म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे