पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त पोस्ट; मोर्चा, बंद अन् धडा शिकवण्याचा इशारा…

लोकसभा निवडणुकीत पराभव, त्यानंतर राजकीय भवितव्याविषयी निर्माण झालेल्या(lesson) पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टमुळे नगरमध्ये वाद निर्माण झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील व्यवहार सकाळपासूनचे बंद होते. मोर्चा काढण्यात आला. तसेच पाथर्डी पोलिस ठाण्यावर सकल वंजारी समाजाच्यावतीनं गुरूवारी मोर्चा नेण्यात आला होता. आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक शांतताभंग केल्याप्रकरणी महेश दत्तात्रय शिंदे (रा. शिरापुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची वादग्रस्त पोस्ट(lesson) टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यावर सकल वंजारी समाजाच्यावतीनो मोर्चा नेण्यात आला. त्या युवकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक भूमिका वंजारी समाजानं घेतली. आम्ही शांत आहे, याचा अर्थ आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या संयमाचा अंत पाहु नका, असा इशारा सकल वंजारी समाजानं दिला आहे. संबंधित युवकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी पाथर्डी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे करण्यात आली.

पोलिसांनी या युवकांना शांत करत आपण कायदेशीर कारवाई करू, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासित केल्यानंतर आलेला शेकडो युवकांचा जमाव शांत झाला. कुणी राजकारणावरून जातीय वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले. शिरापुर येथील महेश शिंदे याच्याविरोधात आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक शांतताभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये जातीवादातून तणाव निर्माण झाला. त्याचे लोण पाथर्डी तालुक्यात पसरू, नये याची खबरदारी घेत संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. सकल ओबीसी समाज, सकल वंजारी समाज, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, लोकनेता मोहत्सव समिती आणि दैवत फाउंडेशन या विविध संघटनेने पाथर्डी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी मोर्चा काढण्यात आला.

पाथर्डीतील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहे. या काळात सामाजिक भावना दुखावल्या जातील, अशी कृती कोणीही करू नये, असे पाथर्डीतील पोलिसांनी आवाहन केले आहे. अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, रणजित बेळगे, अर्जुन धायतडक, अक्षय शिरसाट,अँड.विठ्ठल बडे, भाऊसाहेब शिरसाट, संदीप आव्हाड, संजय शिरसाट, अशोक दहिफळे, सचिन शिरसाट, कानिफ आंधळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

हेही वाचा :

यंदा पण लसण खिसा कापणार; किंमत झाली दुप्पट

निवडणुकीत असे कसे घडले? महायुतीचे नेते विचारात पडले

कारखानदारांसह सरकारला हादरे देणाऱ्या राजू शेट्टींचं नेमकं चुकलं कुठं?