सांगलीचा वाद मिटेना! नाना पटोलेंचा संजय राऊतांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन(political advertising) वाद संपत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभेसाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेस विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहे. यावरुनच काँग्रेस ठाकरे गटात कलगीतुरा पाहायला मिळत असून नाना पटोले यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद कराव्यात. काय बोलावे याचे मर्यादा ठरवाव्या. एका छोट्या(political advertising) कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करु नये, संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, सामोपचाराने प्रश्न सोडवू, उद्या हा प्रश्न सोडवू,” असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

तसेच “एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहे, भाजपने त्यांना त्रास दिला, वाईट ट्रीटमेंट दिली. बलाढय नेते आहेत, स्वयंघोषित विश्व गुरू आहेत, मगं याला घ्या त्याला घ्या अस का करावं लागतं आहे,” असा खोचक सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी याबाबत बोलताना “सांगलीमधून मविआचे उमेदवार चंद्रहार आहेत, आज सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणे झाले. चंद्रहार पाटील हेच सांगलीमधून उमेदवार असतील, असे म्हटले आहे. तसेच यासंबंधी विश्वजित कदम यांच्याशीही बोलणे झाले असून येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल,” असे सूचक विधान केले आहे.

हेही वाचा :

UPI च्या मदतीने कसे कराल पैसे जमा; इतकी सोपी आहे पद्धत

एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा

प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची अशी पोस्ट! ‘अधिक प्रार्थना करा आणि…’