एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्याची होताना पाहु शकला नाही; मंडपाबाहेरच तरूणाने…

बँक्वेट हॉलमध्ये एका युवतीचा लग्नसोहळा(marry) सुरू असताना, गौतमबुद्ध नगरमध्ये राहणाऱ्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडने कारमध्ये स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. अनिल प्रजापती (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत लग्न(marry) होत असल्याचे सहन न झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना दिल्लीच्या गाजीपूरमधील आहे. धक्कादायक बाब म्हणजे १४ फेब्रुवारीला अनिल आणि त्याचा लहान भाऊ सोविंद्र यांचे दुसऱ्या मुलींसोबत लग्न होणार होते.

अनिल कुमार आपल्या कुटुंबासह गौतमबुद्ध नगरच्या नवादा गावात राहत होता. कुटुंबात वडील, आई, मोठा भाऊ सुमित आणि लहान भाऊ सोविंद्र आहे. तो गौतमबुद्ध नगर येथील एका कंपनीत नोकरीला होता. जिल्हा पोलीस उपायुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितले की, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली.

गाजीपूर येथील बँक्वेट हॉलच्या बाहेर कारमध्ये एका युवकाने स्वतःला पेटवून घेतले. लोकांनी कारची काच फोडून युवकाला बाहेर काढले. अनिल बऱ्याच प्रमाणात आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळला होता. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवकाला एलबीएस रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले.

पोलीस तपासात समोर आले की, अनिल एका मुलीवर प्रेम करत होता. पण, तिच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवले. शनिवारी जेव्हा बँक्वेट हॉलमध्ये मुलीचे लग्न सुरू होते, त्याचवेळी अनिलने स्वतःचे जीवन संपवले. मृत अनिलचा भाऊ सोविंद्रने सांगितले की, १४ फेब्रुवारीला अनिलचे लग्न होणार होते.

शनिवारी त्याचा भाऊ अनिल ड्युटीवर गेला होता. संध्याकाळी पाचनंतर तो लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी कारने दिल्लीला आला होता. रात्री १० वाजता फोनवर त्याचे भावासोबत बोलणे झाले. त्यावेळी तो पटपडगंज येथे पत्रिका वाटत होता. रात्री ११.३० वाजता अनिल घरी आला नाही, त्यावेळी कुटुंबाने फोन केला. पण, फोन बंद होता.

हेही वाचा :

संपत्तीबाबत अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

मोठी बातमी! वाल्मीक कराड प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची ‘सीआयडी’कडून चौकशी

Vodafone Idea चा नवीन 209 रुपयांच्या रिचार्ज आला बाजारात, रोज मिळेल 2 जीबी डेटा