90 च्या दशकातील सौंदर्याची खाण आणि अभिनयाने(actress) लाखा चाहत्यांचा मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री नगमा. आज ही अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिने आपल्या कामातून मनोरंजन विश्वास आपली क्षमता सिद्ध केली आहे. नगमाने बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत, पंजाबीपासून भोजपुरी भाषेपर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेत्रीचे प्रेम जीवन सर्वात जास्त चर्चेत राहिले, ती अनेक वेळा प्रेमात पडली, मात्र ती अजूनही एकटी आहे. आज नगमाच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
सलमान खानची या अभिनेत्रीला (actress)नगमा नावाने ओळखली जाते. पण तिचं खरं नाव कोणालाही माहिती नाही. तर तिचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला. नगमाची आई मुस्लिम आणि वडील हिंदू आहेत. अभिनेत्रीची आई शमा काझी यांनी अरविंद प्रताप सिंह मोरारजी यांच्याशी लग्न केलं. मात्र, नंतर दोघे वेगळे झालं आणि त्याच्या आईने दुसरं लग्न केलं.
नगमाने 1990 मध्ये सलमान खानच्या ‘बागी: अ रिबेल लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 1990 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा 7वा चित्रपट ठरला. अभिनेत्रीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावाने एक मंदिर देखील समर्पित केलंय. नगमाला 9 भाषा येतात आणि तिने 10 भाषांमध्ये चित्रपटामध्ये काम केलंय.
भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत नगमाचं नाव बरंच दिवस चर्चेत होतं. दोघेही खूप वेळ एकत्र घालवायचे. असं म्हटलं जातं की सौरव गांगुलीच्या पत्नीला त्यांच्या नात्याची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांचा संसार संकटात आला होता. मात्र, नंतर नगमा आणि सौरवचे ब्रेकअप झाले.
झाल्यानंतर नगमा दक्षिण भारतीय अभिनेता शरथ कुमारच्या प्रेमात पडली. नगमा जेव्हा शरथ कुमारला भेटली तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. त्यांचा नात्याची बातमी पत्नीला कळल्यावर तिने घटस्फोटसाठी अर्ज केला. अनेक वादावादीनंतर नगमाने या नात्याला अपूर्णविराम लावला. असं म्हणतात की, शरथ कुमारने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली, त्यानंतर अभिनेत्रीला साउथ इंडस्ट्री सोडावी लागली. नगमाचे मन पुन्हा एकदा विवाहित अभिनेता रवी किशनवर पडलंय. मात्र, अभिनेत्रीने रवी किशनसोबतचं नातं कधीच स्वीकारलं नाही.
त्यानंतर अभिनेत्री राजकारणाच्या मैदानात उतरली. 2004 मध्ये त्या काँग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशातील मेरठमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभी राहिली. पण तिला पराभवाला सामोरे जावं लागलं. या वर्षी एका जाहीर सभेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले, त्यानंतर तिने असे करणाऱ्या व्यक्तीला थप्पड मारली आणि जाहीर सभेतून मध्येच निघून गेली.
हेही वाचा :
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा
श्रद्धा कपूरचं वरुण धवनला प्रपोज, नकारानंतर घेतलं धक्कादायक पाऊल!
मोठी दुर्घटना! 100 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं