संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळमध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनांना अपघात (accident) झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ जवानांच्या ३ वाहनांना भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक मतमोजणी आटपून सीआरपीएफचे जवान त्यांच्या तीन वाहनाने बीडवरून गडचिरोलीला जात होते. गडचिरोलीच्या दिशेने जाताना यवतमाळच्या धामणगाव जवळ समृद्धी महामार्गावर जवानांच्या वाहनाला अपघात झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एका जवानाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये एका जवानाचा मृत्यू तर चार जवान जखमी झाले आहेत. यामधील तीन जखमी जवानांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गिरीश कुमार, अब्दुल रफ आणि तुकाराम मुंडे अशी या जखमी जवानांची नावे आहेत. मृत जवानाचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी जखमींना भेट देऊन विचारपूस केली.
हेही वाचा :
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?
शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त
अभिनेत्रीचा आधी अफेअरच्या चर्चांना नकार आता थेट किसिंगचा व्हिडीओ समोर