“53 दिवसांपासून संकट, मला जाणूनबुजून टार्गेट केलं, माझा राजीनामा..”, धनंजय मुंडेही आक्रमक

‘माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे. या काळात मी अवाक्षरही बोललेलो नाही. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा (current political news) घेऊन एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे.

माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं हा गड उभा आहे असे बाबांनी सांगितले याच्यासारखी शक्ती आणि विश्वास माझ्या पाठीशी उभा करणं ही फार मोठी जबाबादारी आहे. संकटाच्या काळात हा गड माझ्या पाठीमागे उभा आहे ही फार मोठी शक्ती आहे.

संकट 53 दिवसांचं होते या काळात कधीही मला येथे येता आलं असतं. त्या भावनेतून नाही. पण मनात भावना होती की आपण मंत्री झालो पण गडावर आलो नाही. दर्शनाला आलो नाही. त्यामुळे येथे येऊन दर्शन घेऊन पुढे मुंबईला जायचं. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी शक्ती मिळते, तीच खरी ताकद आहे. सर्वसामान्यांची सेवा करत या सगळ्या गोष्टींतून पुढे निघू.

बाबा कधीच राजकीय(current political news) चर्चा करत नाहीत. मी सुद्धा त्यांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केली नाही. अध्यात्मावर चर्चा झाली. बाबा ज्ञानेश्वरी ग्रंथातून जे काही सांगतात त्यातून काहीतरी मिळतं. ते लाखो लोकांचे जीवन चांगलं बनवण्यासाठी उपयोगी येतं.

जे प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे अशी आमची मागणी आहे.

आती ही भूमिका मी स्वतःहून मांडल्यानंतरही काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे की स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे..

हेही वाचा :

‘स्क्विड गेम ३’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही वेब सिरीज!

जिममध्ये ट्रेनरला वर्कआऊट विचारणं पडलं महागात; धक्कादायक प्रकार समोर

शिंदे गटाच्या नेत्याला धक्का! अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव