आधी स्वतःची नखं नीट कापा वाघनखांवरुन राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

लंडनहून महाराष्ट्रात आणलेल्या शिवकालीन वाघनखांच्या मुद्द्यावरून (nails)राज्यातील राजकारण तापले आहे. वाघनखं वस्तुसंग्रहालयात ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीका करताना नकली वाघांना वाघनखांचे महत्त्व कसे कळणार असे विधान केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाघनखांवर विवाद करू नये, असे सांगत विरोधकांवर टीका केली.

यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकारांशी (nails)बोलताना राऊतांनी भारतीय जनता पार्टीचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आहे का असा सवाल उपस्थित केला आणि फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला.

राऊतांनी शिंदे, फडणवीस, आणि अजित पवार यांना नकली नेते असे संबोधले आणि बेईमान लोकांनी शत्रूंशी हात मिळवणी केली असल्याचे म्हटले. राऊतांनी वाघनखांच्या ऐतिहासिक महत्वावर शंका उपस्थित केली आणि भाजपावर श्रद्धेचा व्यापार केल्याचा आरोप केला.(nails)शिवरायांच्या वाघनखांबाबत आदर आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर वाघनखांचा मुद्दा उचलल्यावर राऊतांनी भाजपाला इशारा दिला की ही फसवणूक त्यांच्या अंगलट येईल.

हेही वाचा :

मगरीसोबतची मस्ती पडली महागात, जबडा उघडला आणि क्षणार्धात… Video Viral

तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी…, लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य

सरकारची ‘लाडका मित्र’ योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात