बापाला भेटून लेक रडत निघाली, आयरा अन् आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक (personal)आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमिरने आपल्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे. आता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. या बातमी नंतर आमिर खानला ट्रोल देखील करण्यात आले आहे.आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. आमिर खानच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट असे आहे. आमिर खानने मीडियासोबत तिची ओळख करून दिली. आता मात्र सोशल मीडियावर आमिर खानच्या लेकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे आमिर आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आमिरच्या लेकीचा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आयरा खान आमिरला भेटून आल्यावर रडताना दिसत आहे. तिचा चेहरा खूप उदास दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये आयरा आमिरशी बोलताना दिसत आहे. नंतर ती आमिरला मिठी मारते आणि गाडीत बसून निघून जाते. तर दुसरीकडे आमिर देखील गाडीत बसून निघून जातो. आमिरला मिठी मारताना आयरा खूप भावुक दिसत आहे.

आयरा ही रीना दत्ता आणि आमिर खान यांची लेक आहे. (personal)2024 मध्ये आयराने जिम ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. व्हिडीओत आयराचा रडवेला चेहरा पाहायला मिळत आहे. मात्र याचे नेमकं कारण काय, अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकरी आयराच्या रडण्याचे कनेक्शन आमिर खानच्या नवीन नात्याशी जोडत आहे. तर अनेकजण आयरासाठी काळजी व्यक्त करत आहे.

कोण आहे गौरी स्प्रंट?
आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बंगळुरूची रहिवासी आहे. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते. गौरी स्प्रंटला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. गौरीने (personal)ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतले असून २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट

बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …

‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत

कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून