कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवडणूक कोणतीही असो, तिचा निकाल(political) लागल्यानंतरचे काही दिवस राजकीय आत्मचिंतनाचे असतात. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले. पण देशात भाजपाला 272 जागा जिंकता आल्या नाहीत. महाराष्ट्रात तर फारच वाईट कामगिरी भाजपची झाली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर बलाढ्य म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथल्या मतदारांनी राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच जल्लोष करता येईल इतके यश मिळवून दिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना मात्र आत्मचिंतन करावे असे संकेत महाराष्ट्राने दिले आहेत.
राजकीय फायदा नक्की होईल असा विचार करून पक्षश्रेष्ठींची मान्यता(political) घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. पण लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्याचे त्यांचे गणित पूर्णपणे फसले. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मला सरकार मधून मुक्त करा अशी फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली. आपली ही मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांच्याद्वारे पक्षश्रेष्ठींच्याकडे पोहोचवली. तसा हा शिस्तभंगाचा प्रकार आहे. आधी पक्षश्रेष्ठी आणि नंतर प्रसारमाध्यम असा क्रम ठेवणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. बराच काळ सत्तेत असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना शिस्त अशी राहत नाही. भाजपची शिस्तीची घडी आता मोडलेली आहे.
शनिवारी मुंबईत भारतीय जनता पक्षाचा चिंतन मेळावा झाला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, जिव्हारी लागेल असा पराभव झाला हे त्यांनी स्पष्टपणे कबूल केले नाही. महायुतीला 131 आणि भाजपला 71 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हातातून निष्डून गेलेले किल्ले परत मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोणताही नेता हा झालेला पराभव सहजपणे स्वीकारत नाही. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्याला अपवाद नाहीत.
अपयश हे पडण्यात(political) नाही तर पडण्यातून न उठण्यात असते हे ज्याला समजले तो पराभूताच्या भूमिकेतून पटकन बाहेर पडतो. शरद पवार हे त्यातील एक आहेत. म्हणूनच त्यांनी दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या. पक्ष फुटल्यानंतर त्यांनी शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मीच आश्वासक चेहरा असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी ते लोकसभा निवडणुकीत सिद्ध करून दाखवले आहे.
40 आमदार, त्यापैकी नऊ मंत्री, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, सोबतीला शिंदे यांचे शिवसेना आणि भाजप हा बलाढ्य पक्ष, इतके चांगले पोषक वातावरण असताना अजितदादा हे घरच्या खेळपट्टीवर हारले. जेमतेम एक खासदार निवडून आला. त्यांनाही आत्मचिंतन करावे लागणार आहे. त्यांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचे खापर घटक पक्षावर फोडले आहे. भारतीय जनता पक्षाची आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची मते सुनेत्रा पवार यांच्याकडे परावर्तित झाली नाहीत असे मिटकरी यांचे म्हणणे आहे. आता सोबत आलेल्या आमदारांची गळती होऊ नये यासाठीच अजितदादांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या एकूण 15 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी सात जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेत फोटो पाडताना त्यांच्यासोबत एकूण 13 खासदार होते. याचा विचार करता त्यांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. चंद्राबाबू नायडू, नितेश कुमार यांच्यानंतर जास्त जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनीही ठाण्याच्या”आनंद मठा “त जाऊन आत्मचिंतन केले पाहिजे.
14 जागा जिंकून ही महाराष्ट्रात(political) राष्ट्रीय काँग्रेसने आणि आठ जागा जिंकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अगदी संयतपणे आनंद व्यक्त केला. त्याला जल्लोषी स्वरूप येऊ दिले नाही. शरद पवार यांनी तर मिळालेले यश हे आमच्यासाठी अनपेक्षितच होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या एकूण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 21 जागा लढवून नऊ जागांवर विजय संपादन केलेला आहे. हे यश त्यांनी जल्लोष करावा इतके नाही.
देशात भारतीय जनता पक्षाला 272 जागा मिळवता आलेल्या नाहीत, महाराष्ट्रातही मोठं अपयश त्यांना मिळालेल आहे याचाच अधिक आनंद उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांना झालेला दिसतो. त्यांनी केलेला जल्लोष हा नऊ जागांवर विजय मिळवला म्हणून नाही तर भारतीय जनता पक्षाची पीछेहाट झाली याबद्दलचा आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळालेले आहे. पण मुंबईतील मराठी मतदारांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलेले नाही तर मुंबईतील अल्पसंख्य समाजाने त्यांना समर्थन दिलेले आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाकरे यांच्याकडे हिंदुत्ववादी मतदारांनी पाठ फिरवलेली आहे असे फडणवीस यांना सुचित करावयाचे असावे. एकूणच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी अनेक राजकीय नेत्यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलेला आहे.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशबखर मिळणार? आठवा वेतन आयोग लागू होणार
.ब्रेकिंग! ‘शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार’
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन, रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना, शरद पवार सरप्राईज देणार?