ओढ्यातील मृतदेह, दहशत आणि कुटुंबाची शोकांतिका!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुरुवारी एकाच दिवशी घडलेल्या तीन घटनांनी कोल्हापूर(streaming services) शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला. रहस्यमय हत्या, गुंडाची हत्या आणि एक ऑनर किलिंग, अशा या तीन घटना आहेत. त्या मागची कारणे किंवा हेतू वेगवेगळे असले तरी समाज मनाला अस्वस्थ करणारे हे गंभीर गुन्हे आहेत. गुंडांच्या डोळ्यांची वाढत चाललेली संख्या, विवाह संस्कार अमान्य करणारे वाढत चाललेली प्रवृत्ती, आणि घराण्याची तथाकथित प्रतिष्ठा, त्यातून उचलले जाणारे टोकाचे पाऊल असे दाहक दर्शन या घटनांतून घडते आहे, किंवा तसे भयावह वास्तव समोर येत आहे. समाजाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि पोलीस प्रशासन यांच्या समोरची आव्हाने वाढली आहेत असे या घटनांवरून म्हणता येईल.

हुतात्मा पार्क नजीकच्या गोमती ओढ्याची(streaming services) पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता म्हणजे गाळ काढण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू असताना शीर नसलेला मानवी मृतदेह तेथे सापडला. हा मृतदेह सडलेला असून तो किमान 15 दिवसांपूर्वी ओढ्यात अज्ञात त्यांनी आणून टाकलेला असावा. मृतदेहाला शिर नव्हते म्हणजे हा मृतदेह कोणाचा आहे हे समजून नये याची खबरदारी अज्ञात गुन्हेगारांनी घेतलेली दिसते. या मानवी देहाचे शीर कुठेतरी सापडल्याशिवाय तो कोणाचा आहे याचा तपास करता येणार नाही. अशा प्रकारची हत्या अनैतिक संबंधातूनच होत असते. या खुनाचे रहस्य उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.

कोल्हापूर जिल्हा, आसपासचे जिल्हे आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील कर्नाटकाचा भाग येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग च्या तक्रारी पासून पोलिसांना या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून, नाल्याची साफसफाई केली गेली नसती तर हा शीर नसलेला मृतदेह ओढ्यातच सडून गेला असता आणि येणाऱ्या पावसाळ्यात त्याचे अवशेष वाहून गेले असते.

हत्तीचा दुसरा प्रकार, पाहणाऱ्यांचा थरकाप उडवणार आहे. रंकाळा तलाव चौपाटी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी अजय शिंदे या गुंडाची चार-पाच गुंडांनी सशस्त्र हत्यारांनी सपासप वार करून हत्या केली. अजय शिंदे हा मृत झाल्यानंतरही त्याच्यावर त्वेषाने वार करण्यात आले आणि हा जीवाचा थरका पडणारा प्रकार शेकडो लोकांनी पाहिला. काही तरुणांनी मोबाईल मध्ये ते दृश्य कैद केले.

गुंडांनी एका गुंडाला ठार मारले असले तरी शेकडो लोकांना साक्षी ठेवून त्यांनी हे अतिशय निर्दयीपणे कृत्य केले आहे याचा अर्थ या गुंडांना पोलिसांचे भय वाटले नाही, कायद्याचे भय वाटले नाही, प्रस्थापित पोलीस प्रशासन आणि कायदा व्यवस्थेचे भय वाटत नाही हीच चिंतेची बाब आहे. त्याचे मूळ इथल्या न्यायव्यवस्थेत आहे. वर्कानुवर्षे सुनावणी शिवाय खटले प्रलंबित पडतात. शिक्षा झाली तरी तिच्या प्रत्येकातील अंमलबजावणीस आणखी विलंब होतो. त्यामुळे खुनासारख्या गुन्ह्याला जन्मठेप, मरेपर्यंत फाशी अशा कठोर शिक्षेची तरतूद असूनही असे गुन्हे कमी होत आहेत असे चित्र दुर्दैवाने दिसत नाही.

शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या वैष्णवी पोवार या तरुणीची, तिची आई शुभांगी, भाऊ श्रीधर आणि मामा संतोष अडसुळे या तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केली. हा हत्तीचा प्रकार काहीसा होनर किलिंगचा आहे. त्याचबरोबर विवाह संस्कार किंवा विवाह संस्थेकडे नव्या पिढीतील काही जणांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याचे दर्शन हा गुन्हा घडवतो. अर्थात सरसकट पिढीची तशी प्रवृत्ती आहे असे म्हणता येणार नाही.

वैष्णवी चे पुण्यातील एका तरुणाची प्रेम संबंध होते. पण त्या दोघांनाही लग्न बंधनात अडकून पडायचे नव्हते. लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये त्यांना राहायचे होते. त्या तरुणाशी लग्न कर किंवा त्याच्याशी असलेले प्रेम संबंध तोडून टाक असा एक पर्याय वैष्णवी समोर ठेवण्यात आला होता. तो तिला मान्य नव्हता म्हणून मग तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. घराची अब्रू रस्त्यावर आणल्याच्या कारणातून तिची हत्या केली गेली. जगण्यासाठी कोणती लाईफ स्टाईल निवडायची याचा गांभीर्याने विचार केला जात नाही, त्याचे उदाहरण म्हणजे वैष्णवी. तिच्यामुळे एक नांदते कुटुंब उध्वस्त झाले आहे. या शोकांतिकेमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे.

हेही वाचा :

ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री आज शिंदे गटात प्रवेश करणार

भारतातील निवडणुकांमध्ये खोडा घालण्यासाठी चीन करणार ‘एआय’चा वापर

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका