इस्रायलने गाझा पट्टीत केलेला भीषण हल्ला: १४९ जणांचा मृत्यू

गाझा पट्टीच्या उत्तर भागात विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतलेल्या पाच मजली इमारतीवर इस्रायलने मंगळवारी पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १४९ जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महिलांचा आणि मुलांचा समावेश आहे. गाझाच्या (Gaza)आरोग्य खात्याने या भयानक हल्ल्याची माहिती दिली आहे.

गाझात सुरू असलेल्या संघर्षात या हल्ल्यामुळे आणखी तणाव वाढला आहे. गेल्या महिन्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाह याच्या वारसासाठी शेख नइम कासीमची निवड करण्यात आली आहे. हिजबुल्लाहने स्पष्ट केले आहे की, इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसार संघटनेची कार्यवाही सुरू राहील.

या घटनांमुळे गाझा(Gaza)पट्टीतील परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे, आणि मानवतावादी संस्थांना तातडीने मदतीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा :

दिवाळीत माणुसकीला काळीमा: तरुणीला दारु पाजून पाच जणांकडून गँगरेप

दिवाळीच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मींना अर्पण करा मोतीचूर लाडू, जाणून घ्या रेसिपी

रिकाम्या पोटी असे खा मनुका, रक्ताची कमतरता होईल दूर