इथे मृत्यू भेटतो….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीच्या टप्पा दोन मध्ये गुरुवारी दुपारी(Death) अमुदान रसायन कारखान्यास भीषण आग लागली. आगीचे लोळ उठण्याआधी काही क्षण कारखान्याच्या रिऍक्टर मध्ये फोटो झाला. हा स्फोट का शक्तिशाली होता की, दोन ते तीन किलोमीटर चौरस क्षेत्रामध्ये असलेली घरे, दुकाने, बंगले, कार्यालये यांचे दरवाजे उचकटले. खिडक्यांची तावदाने फुटली, त्याच्या काचा शरीरात घुसून अनेक जण जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने घाबरून घराबाहेर पडलेले लोक सैरावैरा धावत सुटले. अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत असे समजून लोक घाबरले होते.

या आगीमध्ये आतापर्यंत आठ कामगार कर्मचाऱ्यांचा मृत्यू(Death) झाला असून 70 पेक्षा अधिक कामगार कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिॲक्टर मध्ये स्फोट कशामुळे झाला याची आता चौकशी होईल. त्यातून पुढे काहीही निष्पन्न होणार नाही. कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाईल. तथापि अशा प्रकारचे स्फोट पुन्हा होणार नाहीत, यासाठीच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. औद्योगिक विकास महामंडळाकडे तज्ञ अधिकारी आहेत. त्यांची ही जबाबदारी आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, उल्हासनगर, ऐरोली नाशिक, छत्रपती संभाजी नगर, चिपळूण आधी ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कारखाने आहेत. आणि अशा औद्योगिक वसाहतीमध्ये अशा प्रकारच्या जीव घेण्या आगी यापूर्वी लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेकांनी जीव गमावलेले आहेत.

इतर कोणत्याही उद्योगापेक्षा रासायनिक उद्योग हे अतिशय घातक असतात. सर्व प्रकारचे परवाने मिळवण्याआधी संबंधित रासायनिक कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे आणि अपघात विरोधी यंत्रणा बसवण्यात आलेली आहे असे सांगितले जाते. तथापि व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेली किंवा देण्यात आलेली माहिती ही खरोखरची आहे का? अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे का याची पाहणी संबंधितांच्याकडून केली जातेच असे नाही. नाचवण्यात आलेल्या कागदी घोड्यावर विश्वास ठेवला जातो. आणि मग नंतर केलेल्या चौकशीतून हातात काहीच लागत नाही. कारण कागदावर सर्व काही ठाकठीक दिसते.

डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कारखान्यास लागलेल्या आगीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे(Death). आधी औद्योगिक वसाहत अस्तित्वात आली आणि नंतर जवळच्या परिसरात रहिवासी बांधकामे झाली. औद्योगिक वसाहती पासून विशेषता रासायनिक कारखाने असलेल्या औद्योगिक वसाहती पासून किती चौरस किलोमीटर दूरवर निवासी बांधकामे व्हावीत याचे काही नियम आहेत. डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या आसपास रहिवासी बांधकामे होत असताना संबंधितांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे. कारण बांधकाम परवाना देताना रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत किती अंतरावर आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे.

अमुदान रासायनिक कारखान्यात स्फोट झाल्यानंतर, आसपासच्या अनेक घरांचे, दुकानांचे, कार्यालयांचे नुकसान झाले आहे. या कारखान्याच्या अगदी जवळ असलेले अनेक छोटे उद्योगही भस्मसात झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आधी रासायनिक कारखाने उभारले गेले आणि नंतर आसपासच्या परिसरात लोक वस्ती झाली.
आता लोकवस्ती पासून खूप दूर अंतरावर अशा प्रकारचे कारखाने उभारण्याच्या संदर्भात आपण लवकरच संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाची जबाबदारी म्हणून काही खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहेच त्याशिवाय या रासायनिक कारखान्यातील कसा झाला? त्याच्या कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे. रिऍक्टरची देखभाल व्यवस्थित करण्यात आलेली नसेल तर अशा प्रकारचा स्फोट होऊ शकतो. म्हणूनच या आगीची सखोल चौकशी करून संबंधितांच्या वर कायदेशीर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. प्रत्येक रासायनिक कारखाना म्हणजे
“इथे मृत्यू भेटतो”ही तयार होत असलेली ओळख आगी पेक्षा भीषण आहे.

हेही वाचा :

एका दिवसांत धावून आली लक्ष्मी; या शेअरने केले मालामाल

RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये ‘दे दणादण’, तुफान हाणामारीचा Video Viral

बिग बॉस १७’ विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू