आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!

बंगळुरू : गायक दिलजित दोसांजची सध्या देशभरात एक वेगळीच क्रेझ आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला(live concert) तरुण-तरूणी मोठ्या संख्येने येतात. ही संख्या लाखांत असते. देशातील वेगवेगळ्या शहरांत दिलजितच्या गीतगायनाचे लाईव्ह कॉन्सर्ट होतात. नुकतेच त्याचा बंगळुरू या शहरात एक मोठा लॉईव्ह कॉन्सर्ट शो झाला. या कार्यक्रमात दिलजितने वेगवेगळे गीत सादर करत आपल्या फॅन्सचे मन पुन्हा एकदा जिकंले.

दरम्यान, बंगळुरूतील हा कार्यक्रम भारतभर गाजला. पण या कार्यक्रमाची एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही हजेरी लावली. विशेष म्हणजे दिलजिते गायलेल्या गाण्यावर दीपिकाने ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं.

दीपिका पदुकोणने नुकतेच एका गोड मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून ती फार कुठे दिसली नव्हती. आता मात्र आई झाल्यानंतर दिलजित दोसांजच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या(live concert) रुपात ती पहिल्यांदाच झळकली आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रेक्षकांमध्ये थांबून ती दिलजित दोसांच्या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसतेय. दिलजितच्या गाण्यावर तिने ठाका धरल्याचेही काही व्हिडीओ समोर आले आहेत.

याच कार्यक्रमात दिलजितने दीपिका पादुकोणला स्टेजवर बोलवत तिच्याशी छान गप्पा मारल्या आहेत. त्याने तिची प्रेक्षकांना खास शब्दांत ओळख करून दिली आहे. स्वत:च्या हिमतीवर दीपिकाने बॉलिवूडमध्ये तिचं नाव कमवलं आहे. दीपिका पादुकोणने खूप छान काम केलेले आहे.

आपण दीपिकाला मोठ्या पडद्यावर पाहिलेलं आहे. दीपिकाने स्वत:च्या हिमतीवर, मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं नाव कमवलं आहे. बंगळुरूच्या लोकांना दीपिकाचा अभिमान असायला हवा. आम्हा सर्वांनाच दीपिकाचा अभिमान आहे, अशा शब्दांत दिलजितने दीपिकाची स्तुती केली.

विशेष म्हणजे ही स्तुती करत असताना दीपिका दिलजितसोबत स्टेजवरच उभी होती. या सर्व प्रसंगाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. खुद्द दिलजितने स्व:च्या इन्स्टाग्राम खात्यावर दीपिकासोबतचा व्हिडीओ पोस्टक आहे. या व्हिडीओत दीपिकादेखील दिलजितचे आभार मानताना दिसत आहे.

हेही वाचा :

राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?

आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त