पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

सोलापूर शहरात मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला. नरसय्या आडम यांचा डिपॉझिट देखील जप्त झाला आहे. पराभवानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी संसदीय राजकरणातून निवृत्तीची(retirement) घोषणा केली आहे.

यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता नवीन चेहरा देणार आहे. उद्या जरी निवडणूका लागल्या तरी मी निवडणूक लढणार नाही, असं ते म्हणालेत.

आमच्या पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही. जो चळवळीत पुढे जाईल तोच उमेदवार असेल. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने आचारसंहिता भंग केलेला आहे. त्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असं आडम मास्तर म्हणालेत.

आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार आहे. निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी यापुढे सहभागी होईल, असे म्हणत त्यांनी राजकीय निवृत्तीची(retirement) घोषणा केली आहे.

पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर आणि नरसय्या आडम यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हणावी तशी कडक कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा :

मोहम्मद शमीची Ex-Wife हसीन जहाँचा बेडरुम व्हिडीओ तुफान व्हायरल

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा

अभिनेता अक्षय आठरेचा सोशल मीडिया स्टार ते अभिनेता हा प्रवास आहे खास, युवकांसाठी तो ठरतोय आयडॉल