राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय (win) मिळवलाय.. नणंद भावजयमध्ये झालेल्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. हा पराभव अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. राज्यसभेच्या रिक्त होणा-या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण तसेच राजकारणाची आवड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली. रिक्त होऊ घातलेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी यासाठी ठराव करण्यात आला.
बारामतीची लढाई प्रतिष्ठेची झाली
निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर भावनिक वातावरण बारामतीमध्ये पाहायला मिळालं… निवडणुक जाहिर झाल्यापासूनच या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या.. पवार विरूद्ध पवार असा अगदी चुरशीचा सामना बारामतीमध्ये पाहायला मिळाला.. काही लोक भावनिक आवाहन करतील, तुम्ही भावनेला बळी पडू नका असं आवाहनही अजित पवार यांनी मतदारांना कें होतं. आतापर्यंत तुम्ही लेकीला निवडून दिलंत आता सुनेला निवडून द्या असं म्हणत अजितदादांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी आपला कौल सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात न टाकता सुप्रिया सुळेंना विजयी केलं..
पवार विरुद्ध पवार झालेल्या या बारामतीच्या लढतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.. मात्र शरद पवारांनी बाजी मारत आपणच वस्तात असल्याचं सिद्ध केलंय..
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी ! कालच शपथ, मात्र हा खासदार मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत ?
मयुरी देशमुखची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री; ‘या’ मालिकेत दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत
विदर्भात वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच गेले उडवून