नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ठाकरे गटाने बुधवारी दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत कल्याण(attack) लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा सामावेश आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा पराभव करू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ‘आम्ही नारायण राणे यांचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही बच्चा आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद(attack) साधला. यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘तुम्ही कल्याण-डोंबिवलीमध्ये विद्यमान खासदार आहेत. तुम्हाला खासदारकी उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. तुमच्या युतीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला दिल्ली अभी दूर आहे. या लोकसभा मतदार संघात वैशाली दरेकर त्यांचा नक्कीच पराभव करणार आहे, असे राऊत पुढे म्हणाले.

‘आम्ही नारायण राणे यांचा पराभव केला आहे. अनेक मोठमोठे लोक महाराष्ट्रात पडले आहेत. श्रीकांत शिंदे हे अजूनही बच्चा आहे. ‘बच्चाजी’ हिंमत असेल तर स्वतःची उमेदवारी जाहीर करा, असे राऊत यांनी सांगितले.

संजय निरुपम यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ‘संजय निरुपम यांच्या हकालपट्टीचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा आहे. याविषयी दुसऱ्या पक्षाने बोलणं ठीक नाही. प्रत्येक पक्षात अशी कारवाई केली जाते. कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर त्याचा प्रश्न आहे. पण मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये कोणताही बंडखोर आणि गद्दार टिकणार नाही.’.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊत म्हणाले, ‘महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा होते. जागावाटपावर चर्चा झालेली आहे, पण ज्या बातम्या येतात, त्या चुकीच्या आहेत. भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, तर सांगलीमध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. तिथला उमेदवार मागे घेतला जाणार नाही याची शक्यता नाही. उद्या मी सांगलीला जात आहे. मी तीन ते चार दिवस सांगली दौरा करणार आहे. मतदारसंघाच्या प्रमुख नेत्यांना भेटणार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट

कालचा गोंधळ बरा होता! सामान्य माणसाची प्रतिक्रिया