‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा! केसांचे होईल गंभीर नुकसान

शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासह केस(hair) आणि त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. विटामिनच्या कमतरतेमुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करणे, हेअर मास्कचा वापर, केमिकलयुक्त शँम्पू इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो.

मात्र यामुळे केसांची(hair)गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. सुंदर आणि लांबलचक केसांसाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे केसांची वाढ चांगली होऊन केस सुंदर आणि मजबूत होतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना पोषणाची आवश्यकता असते.

आहारात पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केसांमधील आवश्यक घटक कमी होऊन जातात. केसांच्या वाढीसाठी विटामिन बी 2, बी 3 , बी 6 , बी9 इत्यादी घटक आवश्यक असतात. मात्र शरीरात याचं विटामिनचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस तुटणे किंवा केस गळण्याची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

विटामिन बी 2:
शरीरात विटामिन बी 2 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडा होतो. या विटामिनला रिबोफ्लेविन असे देखील म्हणतात. हे विटामिन त्वचा आणि केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. मात्र शरीरात विटामिन बी 2 ची कमतरता निर्माण झाल्यास टाळूला खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोरडेपण इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे विटामिन बी 2 ची कमी झालेली कमतरता वाढवण्यासाठी आहारात दूध, अंडी, हिरव्या भाज्या आणि काजू इत्यादी पदार्थ खावेत.

विटामिन बी 3:
विटामिन बी 3 ला नियासिन असे म्हणतात. या विटामिनमुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि त्वचेमधील आर्द्रता कायम टिकून राहते. मात्र या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर टाळूला सूज येणे, खाज सुटणे, इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे आहारात मासे, चिकन, कडधान्ये इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी 3 ची कमतरता भरून निघेल.

विटामिन बी 6:
केसांच्या वाढीसाठी विटामिन बी 6 अतिशय महत्वाचे आहे. या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर टाळूवर जळजळ होणे, खाज सुटणे किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू लागतो. त्यामुळे शरीरात कमी झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मासे, शेंगदाणे, सोयाबीन, गहू, ओट्स, केळी, बटाटे, पालक, पालेभाज्या इत्यादींचे सेवन करावे.

हेही वाचा :

वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचा इचलकरंजीत जाहिर निषेध

‘छावा’ चित्रपटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता? कारण आलं समोर

उन्हातही शरीराला थंडावा देणाऱ्या या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश कराच