इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

आयपीएलचा ४७ वा सामना कोलकता नाईट रायडर्स ((kolkata knight riders)दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर झाला असून हा सामना केकेआरने जिंकलाय.


केकेआरने आपल्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट राखत पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाने २० षटकात ९विकेट गमावत १५३ धावा केल्या. कोलकताने १६.३ षटकात ३ विकेट गमावत १५७ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकताचा(kolkata knight riders) हा ६वा विजय आहे.
कोलकताकडून फलंदाजी करताना फिलिप सॉल्टने ३३ चेंडूत ६८ धावा केल्या.

यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर २३ चेंडूत ३३ धावा केल्यानंतर नाबाद राहिला तर व्यंकटेश अय्यर २३ चेंडूत २६ धावा करत नाबाद राहिला. सुनील नारायणने १५ धावा करून तर रिंकू सिंग ११ धावा करून बाद झाला. तर दिल्लीकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेलला दोन विकेट मिळाल्या.

कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तम नेट रन रेटमुळे केकेआरकडे +०.९७६ पॉईंट्स आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे -०.४४२ पॉईंट्स आहेत. कोलकताने ८ सामन्यांत १० मिळवलेत. या ८ सामन्यात कोलकाताने ५ सामने जिंकलेत तर ३ सामने गमावलेत. दिल्लीने १० सामन्यांत ५ जिंकलेत आणि ५ सामन्यात पराभव झालाय. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. जर कोलकताने हा सामना जिंकला तर ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

हेही वाचा :

महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल; कारवाईची शक्यता

शरद पवारांना पुन्हा धक्का; विश्वासू नेते भाजपच्या वाटेवर?

नरेंद्र मोदींच्या सभेला ‘ती’ व्यक्ती उपस्थित राहणार; कोल्हापुरात चर्चांना उधाण