पंतच्या एका चुकीमुळे दिल्लीचा मानहानीकारक पराभव….

आयपीएल (IPL)२०२४ च्या १६व्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर १०६ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडून एक मोठी चूक झाली.

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सुनील नारायण, (IPL)अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. यात हिरो ठरला तो वेस्ट इंडिजचा सुनील नारायण. मात्र, नारायणला बाद करण्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडून मोठी चूक झाली. कदाचित तो लढतीचा टर्निंग पॉइंट ठरला असता.

या लढतीत सुनील नारायणने ३९ चेंडूंत सात चौकार व सात षटकारांसह ८५ धावा केल्या. या जोरावर कोलकात्याने ७ बाद २७२ अशी विशाल धावसंख्या रचली. यात सुनील नारायणला दिल्लीकडून दोन वेळा जीवदान मिळाले. एकदा तर त्याला बाद करण्याबाबत गंभीर चूक पंतकडून झाली.

दिल्लीसाठी सुनील नारायण धोकादायक ठरणार, असा अंदाज आधीच वर्तविण्यात आला होता. कारण, मागील लढतीत सुनील नारायणने बेंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरला. सुनील नारायणने आयपीएल कारकिर्दीत सर्वोच्च खेळी केली. अर्थात, त्याला झटपट रोखण्याची संधी पंतने सोडली. त्याचे असे झाले, की ईशांत शर्माच्या एका चेंडूवर सुनील नारायण चकला. चेंडू बॅटची कड लागून पंतच्या हातात विसावला. सुरुवातीला कोणीच अपील केले नाही. मग, काही खेळाडूंनी पंत आणि ईशांतच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. पंचांकडे अपील करण्यासाठी दहा सेकंदांचा वेळ असतो.

हेही वाचा :

ग्रजीपेक्षा सर्वसामान्य, शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे!

वसंत मोरेंना उमेदवारी निश्चित, महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार का?

छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव;