मुंबई-गोवा हायवे (high way) वर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था झाली आहे. याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत, मात्र, तेथील दयनीय अवस्था पाहता नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था
गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्णच अवस्थेत आहे. रायगड जिल्ह्यातला बहुतांश भाग हा अर्धवट स्थितीतच असल्याचं पाहायला मिळत आहे. नागोठणे जवळील एका वळणावर या हायवेची सूरु असलेलं काम प्रवासी वर्गाला मात्र डोकं दुःखी ठरताना पाहायला मिळतायत. संपुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने येथील वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे या संपूर्ण प्रकाराला कारणीभूत ठरत असून जणू अपघाताला आमंत्रणच देत असल्याच हे चित्रं आहे.
10 वर्षात 6000 कोटी खर्च
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले असल्याची माहिती याआधी माहिती अधिकारातून समोर आली होती. मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) प्रकल्पावरील खर्चाची महत्त्वाची महिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadage) यांनी यासंबंधी मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
दुरुस्तीच्या कामासाठी 192 कोटी रुपये खर्च
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र पीडब्ल्यूडी या दोघांकडून आरटीआय कायद्यांतर्गत या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी एकूण 6000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च रस्त्याच्या सध्याच्या स्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे
हेही वाचा :
पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला…
वय झाले वगैरे सब झूट; शरद पवार पुन्हा पायाला भिंगरी लावून फिरणार
मुन्ना-बंटी वाद आता पुढच्या पिढीत, कृष्णराज महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा लढवणार?