करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज;

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान (worship)असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून, गळ्याखालील भागाला तडे गेले आहेत. त्यामुळे चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे आवश्यक आहे, असा अहवाल न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने दिला आहे.

श्री पूजक गजानन मुनीश्वर ऍड. प्रसन्न माले, दिलीप देसाई यांनी याबाबत माहिती दिली. श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धन संबंधीचा दावा (worship)कोल्हापूरच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये वादी गजानन मुनीश्वर व इतरांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱयांकडून पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके, विलास मांगीराज यांच्या समितीने पाहणी केली आणि आज आपला अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी ऍड. नरेंद्र गांधी, ओंकार गांधी, गजानन मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर आदी उपस्थित होते.

n आठ पानी या अहवालात मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून, ती झीज 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. 2015ला झालेल्या संवर्धनात वापरल्या गेलेल्या साहित्याला तडे गेलेले आहेत. त्यामुळे चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन गरजेचे आहे. या संवर्धन प्रक्रियेत वापरलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचे तसेच अन्य ठिकाणच्या लेपालादेखील तडे गेल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

काय आहे उपाययोजना

n तज्ञ समितीने आपल्या अहवालात विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून मूर्तीला गेलेले तडे बुजावता येतील. नव्याने तातडीने संवर्धन प्रक्रिया करून मूर्ती सुरक्षित करावी.

n श्री अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक न करता नाजूक सुती कापडय़ान पुसून घ्यावे.

n श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीला पुष्पहार न घालता उत्सवमूर्तीला हार घालण्यात यावा.

n गर्भगृहातील संगमरवर काढून टाकावे. कीटकांचा बंदोबस्त करावा. आर्द्रता व तापमानाचे नियंत्रण करावे.

n अलंकार व किरीट घालताना काळजी घ्यावी.

हेही वाचा :

कोल्हापुरात सामायिक शेतीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने केला काकाचा गेम

नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पती आणि प्रियकर दोघांसोबत राहणार; तीन मुलांच्या आईची विचित्र मागणी, पतीने अमान्य करताच…