कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतदान (political campaign) प्रक्रिया आता काही दिवसांवर आल्याने जिल्ह्यातील सर्वच म्हणजे दहा विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला येऊन पोहोचला आहे. आरोप आणि प्रत्यारोपाच्या चिखलफेकीत विकास विषयक प्रश्न, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या, बाजूला पडल्या आहेत. त्यावर चर्चाच होताना दिसत नाही. राष्ट्रीय पातळीवरील तसेच राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या, आणि पक्षीय जाहीरनाम्यातील आश्वासनांची फक्त बरसात केली. उमेदवारांनी स्थानिक मागण्यांवर, समस्यांवर विचारांचा जागर केला नाही मात्र बाहेरून आलेल्या नेत्यांनी आश्वासनांचे गाजर दाखवले.
इचलकरंजी, करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या दहा विधानसभा मतदारसंघात विकास विषयक प्रश्न आहेत. स्थानिक समस्या आहेत. धरणांना लागलेली गळती, कालव्यांचे अस्तरीकरण, समस्यांच्या विळख्यात सापडलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, दळणवळणाची असुविधा, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांची दुरावस्था, पक्या रस्त्यांची वानवा, पर्यटन समृद्ध जिल्हा असूनही प्रथम श्रेणीतील पर्यटन स्थळांकडे कमालीचे झालेले दुर्लक्ष, जिल्ह्यात 60 पेक्षा अधिक गाव तलाव आहेत पण प्रदूषण ग्रस्त बनले आहेत, काही तालुका निहाय प्रश्न आहेत, आणि संपूर्ण जिल्ह्यास व्यापून टाकणारे प्रश्न आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पंचगंगेसह इतर नद्यांचे पाणी प्रदूषण होय.
कोल्हापूर हे कोकण रेल्वेची जोडण्याचा मंजूर झालेला पण कागदावर राहिलेला प्रकल्प, कोल्हापूरला (political campaign)तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळणे, पोलीस आयुक्तालय, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, कोल्हापूर शहराची हद्द वाढ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत असूनही मोठा प्रकल्प नसणे, असे विकास साधणारे प्रकल्प आणि प्रलंबित पडलेल्या समस्या या विषयावर, मुद्द्यांवर या निवडणूक प्रचारात आतापर्यंत चर्चा झालेली नाही आणि प्रचाराच्या उत्तरार्धात ती होण्याची शक्यता नाही.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी त्यांच्या राज्यस्तरीय प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासीनी अंबाबाईच्या कोल्हापुरातून केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार वगैरे नेत्यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात झाल्या पण त्यांनीही परस्परांवर आरोप केले पण या जिल्ह्याच्या विकासावर, प्रलंबित मागण्यांवर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही आणि आश्वासनही दिले नाही.
राज्यातील महिलांना दरमहा 2100 ते 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करणार, महिलांना पूर्णपणे मोफत एसटी बस प्रवास, दहा लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन, शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपया पर्यंत ची कर्जमाफी, कर्जाचे नियमित हप्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, आरोग्य विमा योजना, अशा थेट लाभ देणाऱ्या आश्वासनांची बरसात दोन्ही आघाड्यांकडून करण्यात आलेली आहे.
ही आश्वासने केंद्रस्थानी ठेवून दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजना चर्चेत प्रभावीपणे आणली गेली आहे. महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर विरोधी महाविकास आघाडी कडून या लाडक्या बहिणी योजनेवर टीका सुरू करण्यात आली.
या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीत खडखडाट होणार, विकास कामासाठी निधी उपलब्ध होणार नाही. अशी टीका करणाऱ्या महाविकास आघाडी कडून आता महिलांना आमचे सरकार आले तर तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन प्रभावीपणे देण्यास सुरुवात केलेली आहे.
हेही वाचा :
आमचं सरकार फेसबुक लाइव्ह नाही तर…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात
लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार पण..; पवारांनी सांगितला राज्याचा ‘मूड’
बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप