मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

मुंबई: राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी आज भाजप(political circle) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता शपथविधीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री पदी कोण असणार याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसात रंगल्या होत्या.

एकनाथ शिंदे(political circle) उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदार उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घ्यावी असं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, काल आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मी काल देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यांच्याच चर्चा झाली होती.

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. आमच्या सर्वांची इच्छा आहे. आम्ही शिवसेनेचे जेवढे आमदार, खासदार आहोत. आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं उदय सामंत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही, शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व नेत्यांची, आमदारांची, खासदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असंही उदय सामंत पुढे म्हणालेत.

राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून शिवसेना आमचे भूमिका मांडण्याचा आणि आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, ही आम्हाला खात्री आहे आणि आम्ही केलेल्या आग्रह महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रात संघटन करेल, संघटनेसाठी काम करेन, पण आम्हाला फक्त तेवढंच नकोय. आम्हाला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यांनी प्रशासनामध्ये जावं. त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्यामुळे सरकार येण्यामध्ये ताकद मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये राहावं, त्या योजना पुर्णत्वास न्याव्यात ही आम्हा सर्वांची इच्छा आहे असे उदय सामंत यांनी पुढे म्हटले आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरात राजू शेट्टी पासून फारकत घेतलेले नेते ऊस दरासाठी एकवटले! 

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज! 

विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…