विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं (political consulting firms)नाव निश्चित करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे.

विधानभवनातील भाजप(political consulting firms) विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं.

भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा भाषण केलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल दिला आहे, असं म्हटलं.

मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा :

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…

स्वप्नील जोशी पुन्हा एकदा पडला प्रेमात, अभिनेत्याच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!