देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं कच्चं मडकं; संजय राऊत यांचे टीकास्त्र

नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपा युती निवडणूक हरली होती, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल. त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. फडणवीस हे राजकारणातलं कच्चं मडपं आहे, असे टीकास्त्र्ा शिवसेना पक्षाचे(bird) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोडले.

नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्यात 1999 ला युतीची सत्ता आल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत होते, या फडणवीस यांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. आमची स्वप्न ही राष्ट्र हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी असतात. तुम्हाला स्वप्नांचा जो आजार झालाय, तो आता हळूहळू दूर व्हायला लागला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना मुख्यमंत्री केले होते आणि त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. राणेंच्या नेतृत्वात त्यावेळी शिवसेना, भाजपा युती निवडणूक हरली होती, हे फडणवीस यांना माहिती नसेल, असे खासदार राऊत म्हणाले.(bird)


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, बावनकुळेंचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांना काळू-बाळू कोण आहेत हे माहीत नाही. तमाशाच्या डफावर पडलेली थाप तुमच्या कानाखाली पडली आहे, अशा शब्दात त्यांनी बावनकुळे यांना सुनावले.

शेतकरी नसलेल्या बिल्डरला मोबदला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास मंत्रालय, नाशिकच्या स्थानिक पुढारी व त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांनी भूसंपादनातून नाशिक महापालिकेची नऊशे कोटी रुपयांची लूट केली आहे. याचा पर्दाफाश मुंबईत 14 मे रोजी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह केला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. भूसंपादनाच्या नावाखाली मोबदला घेणारे काही बिल्डर तर मूळ शेतकरीच नाहीत. या घोटाळ्यात कोण-कोण सहभागी आहे, कोण लाभार्थी आहे हे उघड करावेच लागेल. तुम्ही किती खोटारडे आणि भंपक आहात हे दाखवावेच लागेल. आता ईडी, सीबीआय कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा :

कोल्हापूरसह इचलकरंजीला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले!

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?