इचलकरंजी – इचलकरंजी विधान सभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार(political) धैर्यशील माने यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्याची दखल घेतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव घेवून कौतुक केले. त्याबाबतची चित्रफित शहरात व्हायरल झाल्यानंतर आमदार आवाडे यांना विधान सभा निवडणूकीत भाजपची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेने दिवसभर जोर धरला होता.
आमदार आवाडे व माजी आमदार हे कट्टर राजकीय(political) विरोधक आहेत. एकमेकाचे समर्थकही तितकेच कट्टर आहेत. समाज माध्यमातून संधी मिळेल तेथे एकमेकांच्या विरोधात टिपणी करीत असतात. आव्हानात्मक भाषेचाही वापर करण्याची संधी सोडत नाहीत. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी महायुतीचे उमेदवार माने यांना समर्थन दिले होते.
आवाडे हे विधीमंडळातील भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. पण त्यानंतरही आवाडे – हाळवणकर यांच्यात गेल्या साडेचार वर्षात कधीही दिलजमाई झाली नाही. उलट आजही कट्टरता कायम आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेवेळी आवाडे- हाळवणकर यांच्यातील नाराजीनाट्य जोरात चर्चेत आले होते.
या पार्श्वभूमीवर आज थेट फडणवीस यांनी इचलकरंजीतील मताधिक्याचा संदर्भ देत आमदार आवाडे यांचे नाव घेतले. यातून मताधिक्याचे श्रेय फक्त आवाडे यांना देण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. व्हायरल चित्रफितीसह समाज माध्यमात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. किंबहुना आमदार यांना भाजपची उमेदवारी निश्चीत झाल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यामुळे हाळवणकर समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे मुंबईतील भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठरीत फडणवीस बोलत असतांना आमदार आवाडे पहिल्या रांगेत बसले होते. यावेळी फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालावर सकारात्मक बाजू मांडली. कांही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना लक्षवेधी मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये आवाडे यांचे नाव घेत इचलकरंजीत संघात ४२ हजाराचे मताधिक्य मिळाल्याचे सांगितले.
हेही वाचा :
जे आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं…
नरेंद्र मोदींचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही; ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी,आजच करा अर्ज ;1 लाख 24 हजार पगार..