पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप कोसळून ७ ठार

राजूर: आषाढी एकादशीच्या पावन प्रसंगी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या भाविकांवर काळाने (Accident) घाला घातला. गुरुवारी दुपारी राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ त्यांच्या जीपचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या जीपने दुचाकीला धडक दिली आणि नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.

या दुर्घटनेत ७ भाविकांचा जागीच मृत्यू (Accident) झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीपमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु १५ ते २० च्या आसपास भाविक असल्याचा अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या अपघातामुळे (Accident) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीच्या विकासाला भरारी! २० कोटींच्या निधीमुळे पायाभूत सुविधांना चालना

फिजिकल अफेअरपेक्षा इमोशनल अफेअर जास्त घातक…

अभिनेत्री रिचा चढ्ढानं दिला गोंडस मुलीला जन्म