धनंजय महाडिकांची महिलांना भरसभेत धमकी; सतेज पाटलांकडून ‘कोल्हापूरी स्टाईल’ समाचार

लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या(political news todays) सभांना जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, त्यांचे व्हिडिओ काढा. मी त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान, ही चूक समोर आल्यानंतर ते ती मान्य करण्याऐवजी त्याचं समर्थन करत आहेत. यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

यामधून भाजपने लाडकी बहीण योजना(political news todays) फक्त निवडणुकीसाठी आणल्याचे उघड झालं आहे. मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात, तसला हा प्रकार आहे. स्वत: चुकीचं वक्तव्य करायचं आणि देशातील लोकांनी चूक दाखवली की, म्हणायचं ही चूक नाही. ही मोठी धाडसाची कृती म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील भगिनी ही गोष्ट विसरणार नाहीत. भाजपच्या खासदारांनी केलेलं हे वक्तव्य तुम्हाला मान्य आहे का, हे मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारायचे आहे असंही सतेज पाटील म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. भाजपचे नेते बेताल वक्तव्यं करुन महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत चालले आहेत. धनंजय महाडिक भरसभेत भाषणात बहि‍णींना धमकी देतात, तुमची व्यवस्था करतो बोलतात. व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? हा कोल्हापूरमधील महिलांना धमकी देण्याचा प्रयत्न आहे, याकडंही सतेज पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, आपल्या वक्तव्याचा पश्चाताप नाही, ते उलट आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यांच्या व्यवस्था करतो, या शब्दाचा अर्थ काय? धनंजय महाडिकांचं शिक्षण झालं नाही की त्यांना मराठी भाषा कळत नाही.

https://twitter.com/i/status/1855439468167393517

धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर ते म्हणतात की, काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना सामावून घेण्याच्यादृष्टीने मी ते वक्तव्य केले होते, असा दावा महाडिक करतात. पण वंचित महिलांना लाडक्या बहीण योजनेत सामावून घ्यायचे होते तर त्यांचा नाव आणि फोटो घ्या, असे बोलायची काय गरज होती. सरकारने एक जाहिरात देऊन योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना अर्ज करायला सांगितले पाहिजे होते. पण खोटं बोल रेटून बोल ही महाडिकांचा स्टाईल आहे असंही पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा :

आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

भारत – दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या video

चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जासंदर्भात दिला निर्णय, विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?