धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवलं

कोल्हापूर : लाडक्या बहिणींविषयी भरसभेत केलेले वक्तव्य भाजपचे(political news todays) खासदार धनंजय महाडिक यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका सुरु केली आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तरीही धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे.

जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात(political news todays) भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा, त्यांची व्यवस्था आम्ही करू, असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होतं.

सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो.माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले.

मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन.

महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो, असे ते आपल्या माफिनाम्यात म्हणाले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणुकीची आचार संहिता 15 ऑक्टोंबरपासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी करवीर येथील राजकीय प्रचाराची जाहीर सभा होती.

या सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ

सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन

कोल्हापूरच्या इचलकरंजी मतदारसंघात 268 मतदान केंद्रे; मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप सुरू