इचलकरंजी, दि. २७ – इचलकरंजी सुळकूड पाणी(water) योजना कृती समितीच्या वतीने दि. २८ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान सलग ५ दिवस धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन इचलकरंजी शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ दररोज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन सध्याच्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरासमोर घेण्यात आलेल्या आक्रोश, घागर व निषेध मोर्चाच्या यशानंतर करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाद्वारे विद्यमान आमदार, खासदार आणि सरकारला येत्या १० ते १२ दिवसांत, निवडणूक आचारसंहितेपूर्वी, पाणीपुरवठा(water) प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा उद्देश आहे.
यामध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रताप होगाडे, मदन कारंडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, शशांक बावचकर, सुहास जांभळे, राहुल कखंजीरे, पुंडलिक जाधव, प्रसाद कुलकर्णी, कॉ. सदा मलाबादे, विकास चौगुले, वसंत कोरवी, कॉ. सुनील बारवाडे, राजू आलासे, बजरंग लोणारी, जाविद मोमीन, शिवाजी साळुंखे, प्रमोद खुडे, प्रकाश सुतार, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, ज्योत्स्ना भिसे, अवधूत वाडेकर, मुकुंद माळी, युवराज शिंगाडे व इतर प्रमुख मान्यवरांनी केले आहे.
कार्यकर्त्यांनी हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शहरातील सर्व नागरिक, बंधु-भगिनींनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे कृतिसमितीने आवाहन केले आहे.
हेही वाचा:
“धर्मवीर 3′ ची पटकथा मी लिहिणार…”; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
महाराष्ट्र हादरला! मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली…; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच