धोनी-विराटची ‘माहिराट’ मैत्री: “जेव्हाही भेटतो तेव्हा आवर्जून गप्पा मारतो”, धोनीने उलगडलं मैत्रीचं गुपित

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (captain) महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ‘माहिराट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीने अनेकदा एकमेकांबद्दल कौतुकाचे शब्द व्यक्त केले आहेत.

नुकत्याच एका कार्यक्रमात धोनीने (captain) कोहलीसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. “आम्ही भारतासाठी अनेक वर्षे एकत्र खेळलो आणि खूप चांगली भागीदारी केली. जागतिक क्रिकेटमध्ये विराट सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे,” असे धोनी म्हणाला.

धोनीने पुढे सांगितले की, “आम्ही नेहमी भेटत नाही, पण जेव्हाही आम्हाला संधी मिळते, तेव्हा आम्ही एकमेकांशी आवर्जून गप्पा मारतो. सध्या काय चालले आहे याबद्दल बोलतो. आमचे एकमेकांशी असेच संबंध आहेत.”

धोनी (captain) आणि कोहली यांनी एकत्र खेळताना भारताला २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. दोन्ही स्पर्धांमध्ये धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोघांनी एकत्र ८० सामने खेळले असून ३०९० धावांची भागीदारी केली आहे.

हेही वाचा :

“पुढचे तीन महिने मला द्या, मी तुम्हाला….”; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर?

इचलकरंजीतील CCTV कॅमेरे बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता