मुंबई: इंडियनप्रिमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनी(decision) चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून खेळताना दिसला होता. 2024 च्या आयपीएलपूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले आणि तरुण ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईची कमान सोपवण्यात आली. आयपीएल 2024 ला संपून खूप काळ लोटला पण माही पुढच्या सीझनमध्ये खेळणार की नाही हे काही स्पष्ट झालेले नाही. आता या अहवालात समोर आले आहे की धोनीचा पुढील आयपीएल खेळण्याचा निर्णय बीसीसीआयवर अवलंबून असणार आहे.
माही पुढच्या मोसमात खेळणार की नाही याचा निर्णय(decision) बीसीसीआयकडेच असेल असे दिसते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने संघांना आयपीएलमध्ये 5-6 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली, तरच धोनी खेळाडू म्हणून खेळू शकेल.
2025 पूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावापूर्वी आयपीएल संघ बीसीसीआयकडे 4 हून अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी करत असल्याची जोरदार चर्चा होती. सध्या, मेगा लिलावापूर्वी संघ केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. आता मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय खेळाडूंच्या कायम ठेवण्याच्या धोरणात बदल करते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
धोनीच्या चाहत्यांची संख्या फार असल्याचे प्रत्येक आयपीएलच्या हंगामात दिसून येते. चाहत्यांच्या मते धोनीने पुढील हंगाम तरी खेळावा कारण आयपीएलच्या मागील हंगामात धोनीने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. अवघे काही चेंडू खेळायला आलेला धोनी षटकारांचा पाऊस पाडून चाहत्यांना सुखद धक्का द्यायचा.
गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर होता. चेन्नईने 14 पैकी 7 सामने जिंकले आणि 7 गमावले. चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले नसले तरी कर्णधार रुतुराज गायकवाडने फलंदाजी आणि कर्णधारपदात चांगली कामगिरी दाखवली. आता पुढच्या मोसमात सर्वांच्या नजरा पुन्हा गायकवाडकडे असतील. गायकवाड धोनी आणि चेन्नईचा वारसा सांभाळू शकेल नाही हे चाहत्यांना पाहायचे आहे.
हेही वाचा :
मृत्यूनंतरही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता येणार! AI संशोधकांचा दावा
चुकीला माफी नाही! संजू सॅमसनसह ‘या’ खेळाडूंसाठी सूर्या घेणार ‘गंभीर’ निर्णय
मुसळधार पावसात हलकी-फुलकी भूक लागली? मग झटपट बनवा पालक- पनीर कटलेट