धोनी… तू खरंच ग्रेट! या VIDEO मुळे चाहते पुन्हा पडले ‘कॅप्टन कूल’च्या प्रेमात!

महेंद्रसिंग धोनी(dhoni) पुन्हा एकदा त्याच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे चर्चेत आला आहे. एकीकडे IPL 2025 मध्ये धमाकेदार सामने होत असतानाच धोनीने मैदानाबाहेरही चाहत्यांच्या मनात पुन्हा ‘कॅप्टन कूल’ म्हणून आपलं स्थान पक्कं केलं आहे.

अलीकडे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 11 चेंडूत 26 धावा करत संघाला विजय मिळवून देणाऱ्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

धोनी(dhoni) एका विमानतळावरून जात असताना त्याची नजर एका व्हीलचेअरवर बसलेल्या महिलेकडे जाते. ही महिला धोनीसोबत सेल्फीसाठी वाट पाहत होती. हे पाहताच धोनी स्वतः तिच्याजवळ जातो, तिचा मोबाईल घेतो आणि प्रेमळपणे स्वतः सेल्फी क्लिक करतो. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सने अक्षरशः धोनीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

खेळात धोनीची जादू अजूनही कायम आहे. IPL 2025 मध्ये तो CSK कडून शानदार कामगिरी करत आहे. निवृत्तीच्या चर्चांदरम्यानही त्याची मैदानावरील एनर्जी आणि मैदानाबाहेरील नम्रता, यामुळे तो फक्त खेळाडू नव्हे, तर एक ‘भावनिक नायक’ बनून राहिला आहे.

हेही वाचा :

अभिनेता-राजकारणी विजय थलापती विरोधात फतवा जारी

कोल्हापूर : कसबा बावड्यात ‘नटीची मिठी राहिली बाजूला’ अन्… 

मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप