वयाच्या साठाव्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडला आमिर खान?

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान(actor)त्याच्या चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. अभिनेत्याने याआधी दोन वेळा लग्न केले होते, रीना दत्ता आणि किरण राव अशी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नींची नावे आहेत. किरण-आमिर यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा अभिनेता प्रेमात पडला की काय, अशी चर्चा सध्या रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिरच्या आयुष्यात एका मिस्ट्री वुमनची एन्ट्री झाली असून या नात्याबद्दल गांभीर्याने विचार केला जातो आहे.

आमिर खानच्या (actor)आयुष्याबद्दल आलेल्या या अपडेटविषयीचा तपशील ‘फिल्मफेअर’ने शेअर केला. सूत्रांकडून फिल्मफेअरला अशी माहिती मिळाली की, ‘आमिर खानची मिस्ट्री पार्टनर बंगळुरुमधील आहे. आपण त्यांच्या गोपनियतेचा आदर केला पाहिजे आणि कोणताही खासगी तपशील उघड करू शकत नाही, पण हे सांगता येईल की, आमिरने अलीकडेच या महिलेची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करुन दिली. त्यांची ही भेट व्यवस्थित पार पडली’.

दरम्यान कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आमिर सध्या त्याचा मुलगा जुनैद खानचा सिनेमा ‘लव्हयापा’ प्रमोट करताना दिसला होता. सोशल मीडियावर जुनैद आणि खुशी कपूर यांच्या या चित्रपटावर टीका होत असली तरी, आमिर मोठ्या उत्साहाने लेकाच्या सिनेमाचे प्रमोशन करत होता. याशिवाय अलीकडेच त्याने ‘इलू इलू’ या मराठी सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही हजेरी लावली होती.

आमिरने १८ एप्रिल १९८६ मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. त्यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुले आहेत. आमिरच्या ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटासाठी तिने निर्माती म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर २८ डिसेंबर २००५ मध्ये आमिरने किरण रावशी लग्नगाठ बांधली. किरण ‘लगान’साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होती. किरण आणि आमिर यांच्या मुलाचे नाव आझाद आहे. आमिरचे दुसरे लग्नही २०२१ साली संपुष्टात आले. असे असले तरीही पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नींसोबत त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आजही कायम आहेत.

हेही वाचा :

Apple Watch चाहत्यांसाठी मोठी संधी; इथे मिळतोय सर्वात बंपर डिस्काउंट

‘ऑपरेशन टायगर’ होणारच…; महायुतीच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; रेस्क्यू ऑपरेशन सुरू Video Viral