मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. या शपथविधी(government) वेळीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये शपथविधी सुरू असतानाच एक प्राणी मागच्या बाजूने धावत जाताना दिसतो आहेय हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी संध्याकाळी(government) राष्ट्रपती भवनामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीवेळी म्हणजेत मोदींसोबत ७२ जणांनी यावेळी शपथ घेतली.या शपथविधी सोहळ्यासाठी ६ हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित होते. या शपथविधीसाठी सर्व मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या सर्व पाहुण्यांमध्ये एक न बोलवता आलेला पाहुणा दिसून आला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

शपथविधी सोहळ्यावेळीचा एक १२ सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. 12 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मंत्री दुर्गादास उईके शपथ घेताना आणि कागदपत्रावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. त्यांच्या मागून एक वन्य प्राणी पायऱ्यांवरून जाताना दिसतो. तो कोणता वन्य प्राणी आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून तो बिबट्याच असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील प्राणी जर प्राणी बिबट्या असेल तर तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चिंतेचा विषय आहे. जर तो बिबट्या असेल तर दिलासादायक बाब म्हणजे तो स्टेजच्या दिशेने गेला नाही किंवा पाहुण्यांच्या गर्दीकडे गेला नाही. अशा महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रपती भवनात खुलेआम फिरणारा हा कोणता प्राणी आहे, अशी चर्चा लोक या व्हिडिओवरून करत आहेत.

त्या प्राण्यांच्या आकारमानानुसार तो बिबट्या असल्याची शक्यता आहे. तर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरती अनेक जण तो पाळीव प्राणा असावा आसा अंदाज लावत आहेत. तर आत्तापर्यंत हा कोणता प्राणी आहे याची पुष्टी होऊ शकलेली नाही. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडीओच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, जेव्हा काही वाहिन्यांनी यूट्यूबवर डीडी नॅशनलचा शपथविधी सोहळा प्रसारित करण्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तेव्हा तो बरोबर असल्याचे दिसून आले.

हाच व्हिडिओ शपथविधी सोहळ्याच्या कव्हरेजमध्ये दिसत आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपती भवनात वन्य प्राणी मुक्तपणे फिरत आहेत का, असा प्रश्नही अनेक युजर्सनी विचारला आहे. शेवटी सुरक्षा कर्मचारी कुठे आहेत आणि काय करत आहेत? नियंत्रण कक्षाचे सुरक्षा कर्मचारी कुठे आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही का?

हेही वाचा :

इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!

दिवस, राजकीय चिंतनाचे…!

पंतप्रधान मोदींचे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठं ‘गिफ्ट’