कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ईसाप निती मधल्या कथा सुरस असतात, त्या अगम्य(wish) असतात, काहीशा चमत्कारिक असतात पण मनोरंजन करणाऱ्या असतात. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या चार-पाच वर्षांपासून असंच चालू आहे इसापनीती मधल्या कथेसारख. कुणी गौप्य स्फोट केला, तर कुणी राजकीय भाकितांचे रतीब घातले, तर आणखी कोणी राजकीय भूकंप होईल असे सांगितले. थोड्याफार प्रमाणात तसे घडलेही. सर्वसामान्य माणसाला त्याचे ज्या त्या वेळी धक्केही बसले. पण आता लोकांना त्याचीही सवय झाली आहे. आताही बुधवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या गौप्य स्फोटामुळे सर्वसामान्य जनतेला फारसा धक्का वगैरे बसलेला नाही.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनिल देशमुख(wish) हे गृहमंत्री होते. त्यांची ईडी कडून चौकशी सुरू होती. तेव्हा त्यांना विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक प्रस्ताव देण्यात आला होता. 100 कोटी रुपये दर महा मला मिळाले पाहिजेत. अवैध व्यवसाय करणाऱ्याकडून ते वसूल करावेत असा दबाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर टाकला होता, यासह चार एफिडेविट करून आमच्याकडे दिली तर तुम्हाला ईडीच्या कारवाईतून वाचवू असे आमिष दाखवण्यात आले होते. ठाकरे पिता पुत्राला अडचणीत आणण्यासाठी, किंवा त्यांना अटक करण्या साठी हा दबाव होता पण तो त्यांनी मानला नाही. त्यांनी स्वतः तुरुंगात जाणे पसंत केले असा गौप्य स्फोट श्याम मानव यांनी केला आहे. आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यास दुजोराही दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल श्याम मानव यांच्याकडे पुरावे नाहीत. मात्र अनिल देशमुख यांनी यावर पूर्वीच भाष्य केले आहे. आणि मी पत्रकार आहे, शोध पत्रकारिता मी केली आहे. असे ते म्हणतात. याचा अर्थ ते माझ्यावर विश्वास ठेवा, असे अप्रत्यक्ष सांगत आहेत. श्याम मानव यांनी जे काही सांगितले आहे ते बरोबर आहे असे अनिल देशमुख म्हणत आहेत.
अनिल देशमुख यांचे अटकेचे प्रकरण तीन, साडे तीन वर्षांपूर्वीचे आहे. पण श्याम मानव यांनी तेव्हाच एक पत्रकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करणे आवश्यक होते.गौप्य स्फोट करण्यासाठी त्यांनी आत्ताचा मुहूर्त का धरला?
आपण जो दावा करतो आहोत त्याच्या पुष्टीसाठी ते कोणताही पुरावा मात्र देत नाहीत. अनिल देशमुख दुजोरा देतात हा तोंडी पुरावा त्यांच्याकडे आहे. अनिल देशमुख हे सुद्धा ठाकरें पिता-पुत्रांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव आणला होता हे आत्ताच सांगत आहेत. वास्तविक आपल्यावर आलेली आपबिती जनतेसमोर आणण्यासाठी गेल्या तीन साडेतीन वर्षात त्यांना अनेकदा संधी आली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभेत त्यांना हे सांगता आले असते. गेल्या तीन चार वर्षात महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना ईडी, सीबीआय, आयटी, या केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी काहीजण संभाव्य कारवाई टाळण्यासाठी म्हणून भाजपच्या छत्राखाली गेले आहेत हे राजकीय सत्य आहे.
म्हणूनच अनिल देशमुख यांच्यावर श्याम मानव म्हणतात तसा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दबाव टाकला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे दबावाचे पूर्वीचे राजकारण ते आत्ताच का सांगतात? असा सवाल उपस्थित होतो.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयीच्या अनेक(wish) ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. त्यांचे सरकार असताना त्याच्या वर्तुळातील कुणीतरी या ऑडिओ क्लिप्स माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. प्रसंगी मी त्या व्हायरल करू शकतो. शक्यतो मी कुणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला लागले तर मी कुणालाही सोडत नाही असा गर्भित इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना दिला आहे. श्याम मानव, अनिल देशमुख यांच्याकडून इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप झाल्यानंतर विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्याकडे अनिल देशमुख यांच्या ऑडिओ क्लिप्स असतील तर त्यापैकी एक एव्हाना व्हायरल करायला हवी होती. पण ती त्यांनी केलेली नाही. भविष्यात ते करतील याचीही शक्यता दिसत नाही.
श्याम मानव यांनी केलेल्या गौप्य स्फोटाबद्दल, राजकीय क्षेत्रात थोडी फार खळबळ उडाली मात्र सर्वसामान्य जनतेला धक्का वगैरे काही बसलेला दिसत नाही. यापूर्वीचे अनेक धक्के पचवले असल्यामुळे धक्क्यांची आता तिला सवय झालेली आहे. ईसाप नीती मधल्या कथा वाचून सोडून द्यायच्या असतात. तसेच हे……!
हेही वाचा :
आज ‘या’ 5 राशींचं नशीब पालटणार, इच्छित गोष्टी साध्य होणार
“महाराष्ट्रातील सरकार शेठजी-भटजींचे..”,श्याम मानव यांचे टीकास्त्र
ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धा: पदकाची आशा घेऊन सहा भारतीयांचा सहभाग