मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या IPO चर्चा, मालामाल होण्याची नामी संधी

मद्यनिर्मिती करणाऱ्या एका दिग्गज कंपनीने आपला आयपीओ(IPO) आणला आहे. या कंपनीत पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याची ही नामी संधी आहे. अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स असे या कंपनीचे नवा आहे. आज म्हणजेच 25 जून रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 1500 कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. या कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स या कंपनीने हा आयपीओ(IPO) आणताना त्यासाठी किंमत पट्टा 267 ते 281 रुपये प्रति शेअर ठेवला आहे. तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 53 शेअर्सचाल लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याडे कमीत कमी 14,893 रुपये असणे गरजेचे आहे.

किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी 13 लॉट म्हणजेच 689 शेअर्सवर बोली लावू शकतात. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार एका वळी जास्तीत जास्त 1,93,609 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 500 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून शेअर्स जारी केले आहेत. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी 26 रुपये प्रति शेअर्सच्या हिशोबाने सवलत देत आहे.

आयपीओची संपूर्ण माहिती?
आयपीओ लॉन्च होण्यची तारीख – 25 जून 2024

आयपीओ बंद होण्याची तारीख – 27 जून 2024

शेअर्सचा किंमत पट्टा – 267 रुपये ते 281 रुपये प्रति शेअर

आयपीओच्या माध्यमातून किती रक्कम जमा केली जाणार -1500 कोटी रुपये

शेअर्स अलॉट कधी होणार – 28 जून 2024

अयशस्वी गुंतवणूकदारांना 1 जुलै 2024 रोजी रिफंड मिळणार

एक जुलै रोजी डी-मॅट खात्यावर शेअर्स क्रेडिट होणार

2 जुलै 2024 रोजी ही कंपनी BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहे.

आज खुल्या झालेल्या आयपीओला दुपारी 12 वाजेपर्यंत 0.18 पट सबस्क्राईब करण्यात आलंय. ग्रे मार्केटमध्येही हा आयपीओ चांगली कामगिरी करताना दिसतोय. investorgain.com या संकेतस्थळाच्या माहितीनुसार या कंपनीचा शेअर 80 रुपयांच्या जीएमपी म्हणजेच 28.47 टक्क्यांच्या प्रीमियवर ट्रेंड करत आहे. हीच स्थिती आगामी काही दिवसांत कायम राहिल्यास लिस्टिंगच्या दिवशी ही कंपनी 361 रुपयांच्या मूल्यावर सूचिबद्ध होऊ शकते.

हेही वाचा :

मनोज जरांगेंवर गंभीर गुन्हे दाखल करा; अन्यथा आत्मदहन करेन, कुणी दिला इशारा?

इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर कारवाई करा अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारा! Video

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचा सांगली जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा